loader
Breaking News
Breaking News
Foto

इन्सुली पोलीस चेकपोस्ट येथे श्वानपथकाच्या मदतीने वाहनांची तपासणी

बांदा (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्हा तसेच गोवा राज्यात सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सुली पोलीस चेकपोस्ट येथे विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा सिंधुदुर्ग व बांदा पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत येणाऱ्या-जाणाऱ्या खाजगी बसेस तसेच इतर वाहनांची श्वानपथकाच्या मदतीने सखोल तपासणी केली. पर्यटकांच्या वाढत्या वर्दळीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ जिल्ह्यातून वाहतूक होऊ नयेत, यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात असून अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg