सावंतवाडी : भारत सरकारतर्फे घरसूची आणि गृहगणना लवकरच सुरू होणार आहे. यापूर्वी १५ दिवसांची एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे, ज्यामध्ये स्वतः आपली माहीती ऑनलाईन भरू शकता. जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात १ मे ते १४ मे दरम्यान स्व-गणना होणार आहे अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.
यात नागरिक आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरू शकतात. ऑनलाईन नोंदणीत https://se.census.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करता येणार आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव आणि १० अंकी मोबाईल क्रमांक नोंदवून ओटीपीद्वारे लॉग-इन कराव, आपला जिल्हा, पिन कोड आणि गावाचे नाव निवडावी, गुगल मॅपवर आपल्या राहण्याचे ठिकाण निश्चित करावे, विचारलेल्या ३३ प्रश्नांची उत्तरे पर्यायांमधून निवडाव तसेच माहितीची खात्री करून 'फायनल सबमिशन' करावे. त्यानंतर आपल्याला ११ अंकी एसई आयडी प्राप्त होईल. हा एसई आयडी जपून ठेवाण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा. त्यानुसार स्व गणना करता येणार असून यानंतर १५ मे ते १५ जून आमच्या प्रगणकांच्या माध्यमातून प्रत्येक घरात भेटी देऊन माहिती गोळा करणार आहेत. मात्र, स्व जनगणनेचा पर्याय उपलब्ध असून त्याचा फायदा नागरिकांनी करून घ्यावा असे आवाहन तहसीलदारांनी केलं आहे. तुमची सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित ठेवली जाणार असून आमची जनगणना, आमचा विकास असल्याचे मत श्री. पाटील यांनी व्यक्त केले आहे.







































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)




























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.