loader
Breaking News
Breaking News
Foto

वायरी भूतनाथ येथे तांब्याच्या हांड्यांची चोरी

मालवण (प्रतिनिधी) - वायरी भूतनाथ येथील वाईरकर रापण संघाच्या मच्छीमारी शेड मधून तांब्याचे दोन मोठे हांडे चोरीला गेले असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची तक्रार वाईरकर रापण संघाच्या वतीने तुकाराम झाड यांनी मालवण पोलिसात दिली आहे. पोलिसांनी याबाबत अज्ञाता विरोधात तक्रार दाखल केली आहे. वायरी भूतनाथ समुद्र किनारी पारंपरिक मासेमारी करणाऱ्या वाईरकर रापण संघाची शेड वजा झोपडी आहे. या शेडमध्ये सुमारे ७० ते ७५ हजार किंमतीचे तांब्याच्या धातूचे दोन मोठे हांडे ठेवण्यात आले होते. ही दोन्ही हांडे अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्रीच्या वेळी लंपास केले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच भागात पर्यटकांचा एक ग्रुप रात्री आपली भांडी घेऊन जेवण बनवत असल्याचे काही मच्छीमारांनी पाहिले होते. चोरीच्या घटनेची माहिती समजतात नागरिकांनी परिसरात या पर्यटकांच्या ग्रुपचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सापडून आले नाहीत. पोलिसांनी चोरीच्या प्रकरणाचा शोध घेत चोरट्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे. दरम्यान, रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरीच्या घटनांवर पायबंद बसण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg