सावंतवाडी (प्रतिनिधी): "शिक्षणाची अनेक दालने आज खुली आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ पदव्या न मिळवता अधिकारी आणि यशस्वी उद्योजक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून वाटचाल केली पाहिजे," असे प्रतिपादन सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी केले. सावंतवाडी - दोडामार्ग - माजगाव केंद्रांतर्गत आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या प्रसंगी ते बोलत होते. स्पर्धा परीक्षेत जिल्ह्याचा टक्का वाढवण्याचा संकल्प: सिंधुदुर्ग जिल्ह्याला माध्यमिक व उच्च माध्यमिक निकालाची उज्ज्वल परंपरा आहे. मात्र, कुशाग्र बुद्धिमत्ता असूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्ह्याचे विद्यार्थी मागे पडताना दिसतात. ही उणीव भरून काढण्यासाठी शालेय स्तरापासूनच मुलांची तयारी करून घेणे आवश्यक आहे. याच हेतूने विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून या विशेष सराव परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते.
सावंतवाडी, दोडामार्ग आणि माजगाव अशा तीन केंद्रांवर परीक्षा उत्साहात पार पडली. "शिक्षण हेच विकासाचे मुख्य सूत्र" मानून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण करणेसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहे. विक्रांत सावंत यांनी स्वतः परीक्षा केंद्रांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा आकर्षक भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या अभिनव उपक्रमासाठी सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, आणि शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, मुख्याध्यापक एस. एन. पाटील, मुख्याध्यापिका एस. एस. कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक एन. जी. मुठे आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ही परीक्षा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सहभागी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले असून अंतिम परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.







































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)




























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.