loader
Breaking News
Breaking News
Foto

अल्पवयीन युवतीचा शोध घेण्यात खेड पोलिसांना यश

खेड : तालुक्यातील बिजघर लाववाडी येथील अल्पवयीन युवतीचा शोध घेण्यात येथील पोलिसांना यश आले आहे. २१ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास या युवतीचे अपहरण करण्यात आल्यानंतर युवतीच्या आईने येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समेल सुर्वे करीत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस विशाखा चव्हाण, जयश्री जाधव यांच्या महिला व बाल कक्ष या पथकाने अपहरण झालेल्या मुलीचा गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत तिला शुक्रवार, २४ एप्रिल रोजी ताब्यात घेऊन तिला येथील पोलीस ठाण्यात आणण्यात यश प्राप्त झाले असून, सर्व प्रकारची खातरजमा करून अपहरण झालेल्या १५ वर्षीय युवतीस तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती कनोजा करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg