दापोली (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील हर्णे जवळील खोल समुद्रात सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी डिझेलची तस्करी करणाऱ्यावर कारवाई करत 2 जणांना अटक करून काल दापोली न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 6 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सीमाशुल्क दापोली विभागाच्या अधिकार्यानी मध्यरात्री खोल समुद्रात जाऊन ही कारवाई केली आहे. 21 एप्रिल रोजी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. यामध्ये रत्ना माऊली या मासेमारी बोटीमधून अन्य मासेमारी बोट तेथे डिझेल घेण्यासाठी आली होती ती दत्तजयंती ही बोटही रत्नामाऊली बोटीसह ताब्यात घेऊन दाभोळ धक्का येथे आणण्यात आली. तेथे या बोटींचा पंचनामा करण्यात आला.
रत्नामाऊली या मासेमारी बोटीत मासे ठेवण्याच्या कप्प्यात 14 टन डिझेलचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. दोन बोटी व डिझेलचा साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी मुंबई येथील दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांची न्यायालयाच्या आदेशानुसार काल सायंकाळी रत्नागिरी येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या डिझेल तस्करीची पाळेमुळे खणून काढली जाणार असल्याचा विश्वास सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखविला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे मासेमारीसाठी लागणाऱ्या डिझेलच्या भावात वाढ झाल्याने मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांना तुलनेत स्वस्त दरात या तस्करांकडून डिझेलचा पुरवठा होत असल्याने या तस्करांकडून डिझेल विकत घेण्याचा ओढा वाढला असून या भागात गेल्या 2 महिन्यात रत्नमाऊली या मासेमारी बोटीतूनच सुमारे 300 टन डिझेलचा पुरवठा करण्यात आला आहे.
डिझेल तस्करिमूळे शासनाचा मोठया प्रमाणात महसूल बुडत असल्याने शासनाचेही नुकसान होत आहे. सीमाशुल्क विभागाने या प्रकरणात दोन जणांवर जरी कारवाई केली असली तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपर्यंत सीमाशुल्क विभागाचे अधिकारी पोचणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







































































































































































































1.jpg)





























































































































2.jpg)





























.jpg)




























































































































































































1.jpg)




















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.