loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात स्वतःच्या तीन महिन्याच्या मुलाच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे पोलिस आयुक्तालय हद्दीत मुंब्रा येथे राहणाऱ्या पती-पत्नी यांच्या तीन महिन्याच्या मुल मित्रला दाखवायचे असल्याचा बहाणा करून मानपाडा येथे आल्यानंतर तक्रारदार यांचे पती याने तक्रारदार यांच्याकडून स्वतःचे ३ महिन्याचे मूल घेऊन कारमधून पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तक्रारदार महिलेने आपल्याच पतीच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तक्रारदार २९ वर्षीय महिला रा,अमृतनगर, मुंब्रा, येथे पती (३८) वर्षीय याच्या सोबत राहत होती. त्यांना नुकतेच पुरुष जातीचे अपत्य तीन महिन्यापूर्वी झाले होते. सदर आपत्य मित्राला दाखवायचे आहे असे सांगून पती याने आपली पत्नी तक्रारदार याना मुलासह २३ एप्रिल, २०२६ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या लॅक्सवास हॉटेल, माजिवाडा येथे बोलावले. रिक्षाने तक्रारदार आल्यानंतर पती याने तक्रारदार यांच्या ताब्यातून तीन महिन्याचे मूल घेऊन ईर्टिका कारमधून न सांगताच पळून गेला. अखेर तक्रारदार महिलेने कापूरबावडी पोलीस ठाण्यात आपल्याच पतीच्या विरोधात मूल पळविल्याचा गुन्हा दाखल केला. कापूरबावडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg