loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात विरूद्ध दिशेने रिक्षा चालवुन नियमभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्यात एका बेशिस्त रिक्षाचालका ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रीज येथे विरुद्ध दिशेने रिक्षा चालवत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाणे वाहतूक विभागाने त्या बेशिस्त रिक्षाचालकाचा छडा लावला. तसेच, या घटनेची गंभीर दखल घेत ठाणे शहर वाहतूक विभागाने विरूद्ध दिशेने रिक्षा चालवल्याप्रकरणी रिक्षा चालक कृष्णा राकेश गुप्ता (वय २९) याच्या विरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुन्हा दाखल झालेला रिक्षाचालक कृष्णा गुप्ता हा कळवा, खारेगाव कावेरी हाईट्स येथे राहणारा असून या रिक्षाचालकाने गुरुवारी (ता.२३ एप्रिल) दुपारी ठाणे स्टेशनवरून घोडबंदर रोड पातलीपाडा येथे जाण्यासाठी शेअरिंग दोन प्रवाशी रिक्षात घेतले. दरम्यान, एका प्रवाशी महिलेला पातलीपाडा ब्रीजखाली न सोडता रिक्षा थेट पुलावरून दामटवली. तसेच, त्या महिला प्रवाशीला सोडण्यासाठी पुन्हा पातलीपाडा ब्रीज जवळील उतरणीवरून विरूद्ध दिशेने रिक्षा नेण्याचा प्रयत्न केला. त्यामूळे या रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. या मुजोर रिक्षाचालकाला रस्त्यावरील अनेक वाहन चालकांनी समजावून सांगूनही गाडी मागे न घेता त्याने अरेरावी केली. रिक्षा चालकाच्या या बेशिस्त वर्तणुकीचा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेची वाहतूक पोलिसांनी गंभीर दखल घेतली.

टाइम्स स्पेशल

तसेच, रिक्षाच्या नंबरवरून कळवा येथे राहणाऱ्या रिक्षाचालक कृष्णा गुप्ता याचा शोध घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कासारवडवली वाहतूक उपविभाग येथील नेमणुकीतील पोलीस हवालदार दत्तात्रय पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 126(2) सह मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. दरम्यान, बेशिस्त रिक्षाचालकांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg