वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील जानवळे (जानवळकरवाडी) येथील श्री साई मंदिराचा २८ वा वर्धापन दिन सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी श्री साई मुर्तीला विधिवत अभिषेक, तसेच श्री साई मंदिर २८ वा वर्धापन दिनानिमित्त साईभक्त सुनील शांताराम भोसले, पांगरी. (संगमेश्वर तालुका) यांनी सार्थ साईसच्चरित मधील १५ व्या अध्यायाचे वाचन केले. ग्रंथ ओवी गोविंद रघुनाथ दाभोलकर (हेमाडपंत) यांची असून त्याचे अनुवादक साईभक्त शिरिष गणपत संभूस (कराड) यांनी केले. श्री सत्यनारायण महापुजा, तीर्थप्रसाद, आरती, दुपारी गुहागर तालुक्यातील नामवंत व सुप्रसिद्ध ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.कमलाकर वनगे जानवळे महाराज यांचे किर्तन, दुपारी सर्व साई भक्तांसाठी साई भंडारा (महाप्रसाद), रात्रौ महाआरती, रात्रौ दत्तगुरु दर्शन मंडळ जानवळे मधलीवाडी यांचे भजन संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या दरम्यान गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी श्री साईंचे दर्शन घेतले. तहसीलदार परीक्षित पाटील यांचा श्री साई भक्तांकडून सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शृंगारतळी येथील विष्णुपंत पवार मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. राजेंद्र पवार यांनीही उपस्थित राहून श्री साईंचे आशीर्वाद घेतले त्यांचाही साई भक्तांच्या वतीने सन्मान करण्यात आला. गुहागर तालुक्यातील विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे शोभा वाढवली. या कार्यक्रमासाठी सर्व साईभक्त तसेच वाडीतील व गावातील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.