loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभोळच्या महिलेचा कतारमध्ये सन्मान; सामाजिक कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल!

दाभोळ (वार्ताहर) :- महाराष्ट्र मंडळ, कतार यांच्यावतीने एक विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. दाभोळ (भारत) येथील महिला सना अनस मंडलेकर ( सना आदम बांदेकर) यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. परदेशात राहूनही त्यांनी दिलेले सातत्यपूर्ण सहकार्य, सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि मोलाचे मार्गदर्शन याची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्या सध्या कतारमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असून, शिक्षण क्षेत्रातही त्या आपली उल्लेखनीय सेवा बजावत आहेत. तसेच त्या प्रख्यात समाजसेवक आणि ‘फख्रे इंसानियत’ सन्मानाने गौरविण्यात आलेले कमाल मंडलेकर यांच्या सुन आहेत. त्यांच्या कुटुंबातील सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेत त्यांनी स्वतःच्या कार्यातूनही समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्र मंडळ, कतारच्या कार्यकारी समिती (२०२४–२०२६) तर्फे त्यांच्या समर्पण व सेवाभावाचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मोठी मदत झाली असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. या सन्मानामुळे दाभोळसह संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg