loader
Breaking News
Breaking News
Foto

कळणे येथे घरात चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

दोडामार्ग (प्रतिनिधी) - सध्या लग्न सराई सुरू झाली आहे त्यामुळे चोरटयांनी कोण कुठे जातो यावर पाळत ठेवून घर फोडून चोर्‍या करण्याच्या घटना वाढल्या आहेत. शनिवारी सायंकाळी कळणे नुतनवाडी येथील देसाई कुटुंब बाजूला हळदी समारंभात गेले असता संधी साधून चोरटयांनी घराची कौले काढून घरात प्रवेश करून पर्समध्ये ठेवलेले तीस हजार, खिशातील एक हजार, नाकातील नथ तसेच मुलांने साठवलेले बचत बॅक मिरर मधिल पैसे असा अंदाजे चाळीस हजार रुपये मुद्देमाल चोरून नेला. या घटनेने खळबळ उडाली आहे. चोरटयाने पाऊण तासात काम फत्ते केले. तसेच गोळा करून ठेवलेली पंधरा किलो काजू पिशवी नेली. राञी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास भाऊ कमलाकर देसाई घरी आले असता दरवाज्याच्या ठिकाणी कागदपत्रे पडलेली दिसली. उंदरांनी टाकली असावी यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही. पुढे घरात गेल्यावर घराची कौले काढलेली दिसली तर कपाटातील कपडे विस्कटून खाली टाकलेल्या स्थितीत दिसल्याने चोरी झाली हे त्यांच्या लक्षात आले. सरपंच अजित देसाई यांना माहिती देण्यात आली. त्यांनी पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पुरूषोत्तम बळीराम देसाई यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध दोडामार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg