loader
Breaking News
Breaking News
Foto

मांडवे येथे गोठ्याला भीषण आग; आर्थिक नुकसान

खेड - तालुक्यातील मांडवे येथे काल रात्री सुमारे ९ वाजण्याच्या दरम्यान श्रीमती गायत्री संतोष मोरे आणि श्रीमती शारदा संतोष मोरे यांच्या गोठ्याला अचानक आग लागून संपूर्ण गोठा जळून भस्मसात झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर गोठ्यातील गुरे व वासरे यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गोठा पूर्णपणे जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या आगीत गोठ्यातील साहित्य व इतर वस्तूंसह सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. श्रीमती गायत्री मोरे आणि श्रीमती शारदा मोरे या दोन्ही महिला विधवा असून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मुख्यतः दुधाच्या व्यवसायावर अवलंबून होता. त्यामुळे या दुर्घटनेमुळे त्यांच्या समोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. घटनेनंतर पंचनामा करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी डुकरे, पंचायत समिती सदस्य सुनिता कासार, मांडवे पोलीस पाटील नरेश तांबे, वाडी जैतापूर पोलीस पाटील बाळकृष्ण कासार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेनंतर संबंधित कुटुंबांना तातडीने शासकीय मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg