loader
Breaking News
Breaking News
Foto

निरवडे महोत्सवात खाद्य स्टॉल लावण्यासाठी व्हा सज्ज

सावंतवाडी : निरवडे ग्रामस्थ आणि श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळ आयोजित 'निरवडे महोत्सव २०२६' निमित्त यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सोबतीला खवय्यांसाठी 'खाद्य महोत्सवाचे' विशेष आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३ आणि ४ एप्रिल रोजी माळकरवाडी येथे हा भव्य सोहळा संपन्न होणार असून महोत्सवाचे यंदाचे स्वरूप अतिशय व्यापक असणार आहे. या खाद्य महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक बचत गट, गृहिणी आणि खाद्य व्यावसायिकांना आपले पदार्थ प्रदर्शित करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. कोकणी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या महोत्सवात पारंपरिक खाद्यपदार्थांसोबतच आधुनिक पाककलांचा मेळ पाहायला मिळणार आहे.तरी इच्छुक व्यावसायिकांनी स्टॉल नोंदणी व अधिक माहितीसाठी ९९२१६००४४४, या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या महोत्सवाच्या दोन्ही दिवशी सायंकाळी ७ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असताना, प्रेक्षकांना या विविध चवींचा आस्वाद घेता येईल. आयोजकांनी यंदा पर्यटकांच्या आणि स्थानिक रसिकांच्या संभाव्य गर्दीचा विचार करून स्टॉलसाठी विशेष नियोजन केले आहे. यामुळे स्थानिक उद्योजकांना चांगल्या आर्थिक उत्पन्नाची संधीही यानिमित्ताने मिळणार आहे. ​जे स्थानिक विक्रेते, बचत गट किंवा खाद्यप्रेमी आपले स्टॉल या महोत्सवात लावू इच्छितात, त्यांनी आपली नावनोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

महोत्सवाच्या ठिकाणी जागा मर्यादित असल्याने 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर स्टॉलचे वाटप केले जाईल. इच्छुक व्यावसायिकांनी स्टॉल नोंदणी व अधिक माहितीसाठी ९९२१६००४४४, या क्रमांकावर संपर्क साधावा. सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच चविष्ट पदार्थांची ही मेजवानी अनुभवण्यासाठी सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव महापुरुष कला क्रीडा मंडळाने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg