loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये २९ मार्च रोजी पहिले कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन: ॲड. तु. ल. डफळे भूषवणार 'स्वागताध्यक्ष' पद

खेड : विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित पहिल्या 'कोकण विभागीय विद्रोही मराठी साहित्य संमेलना'च्या निमित्ताने खेड नगरी सजली असून, या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्वागताध्यक्षपदाची धुरा कुणबी शिक्षण प्रसारक संस्था, खेड-मुंबईचे सचिव तथा तु. बा. कदम महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड. तु. ल. डफळे सांभाळणार आहेत. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे या संमेलनाला एक वेगळी उंची प्राप्त झाली असून, ॲड. तु. ल. डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाचे नियोजन अत्यंत नेटकेपणाने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येत्या २९ मार्च रोजी खेड येथील फुले-शाहू-आंबेडकर साहित्य नगरीत हे संमेलन संपन्न होत आहे. ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक प्रा. आशालता कांबळे (मुंबई) भूषवणार आहेत. स्वागताध्यक्ष या नात्याने ॲड. तु. ल. डफळे यांनी या संमेलनाच्या माध्यमातून कोकणातील वैचारिक आणि सांस्कृतिक वारसा अधिक प्रगल्भ करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील स्वागत समितीने परिसरातील साहित्यप्रेमी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण केला आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता भव्य सांस्कृतिक विचार यात्रेने होईल. ही यात्रा एसटी स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे संमेलनस्थळी दाखल होईल. सकाळी १० वाजता गीत गायनानंतर मुख्य उद्घाटन सोहळा प्रा. प्रतिमा परदेशी यांच्या हस्ते पार पडेल, ज्यामध्ये प्रा. अंजली आंबेडकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. याप्रसंगी श्रीकांत सकपाळ प्रास्ताविक करतील, तर ॲड. सुदीप कांबळे विद्रोही भूमिकेची मांडणी करतील.

टाईम्स स्पेशल

यावेळी प्रख्यात आंबेडकरी इतिहासकार ज. वि. पवार यांना प्रदान करण्यात येणारा 'जीवनगौरव' पुरस्कार होय. दुपारी १२ वाजता 'धर्म, संस्कृती, संविधान आणि मराठी साहित्य' या विषयावर अभ्यासपूर्ण परिसंवाद होईल. त्यानंतर होणाऱ्या कवी संमेलनात ४० हून अधिक कवी सहभागी होऊन आपल्या रचना सादर करतील. सायंकाळी विविध सामाजिक व सांस्कृतिक ठराव मांडल्यानंतर या सोहळ्याचा समारोप होईल. स्वागताध्यक्ष ॲड. तु. ल. डफळे यांनी सर्व साहित्यप्रेमींना या वैचारिक मंथनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg