रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील कोकणनगर, कीर्तीनगर, क्रांतीनगर आणि स्टेट बँक कॉलनी परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. येत्या आठ दिवसांत रस्त्यांची दुरुस्ती किंवा नूतनीकरण न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने 'रस्ता रोको' केले जाईल, असा इशारा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी तालुखाप्रमुख शेखर घोसाळे, शहर संघटक प्रसाद सावंत, केतन शेट्ये, शिवानी माने, नितीन तळेकर आदी यावेळी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ४ चे स्थानिक उमेदवार व नगरसेवक केतन उमेश शेट्ये यांनी २३ फेब्रुवारी २०२६ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचे या समस्येकडे लक्ष वेधले होते. मात्र, महिना उलटून गेल्यानंतरही रस्त्यांची स्थिती ‘जैसे थे’ असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. नागरिकांच्या या जीवघेण्या समस्येची दखल घेत उबाठाचे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर प्रशासनाने पुढील आठ दिवसांत कामाला सुरुवात केली नाही, तर पक्षाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.






































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)

















71.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.