loader
Breaking News
Breaking News
Foto

‘सिंधुरत्न समृद्ध योजना’ ठरतेय महिलांसाठी संधीचं सुवर्णद्वार

रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी आणि ग्रामीण महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 'सिंधुरत्न समृद्ध योजना २०२३-२४' मैलाचा दगड ठरत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध महिला प्रभागसंघांना टुरिस्ट बस आणि हाऊसबोटचे वाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून महिलांनी पर्यटनाच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, केवळ वर्षभरात या उपक्रमातून ४८ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवण्यात महिलांना यश आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणात पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने प्रशासनाने महिला प्रभागसंघांना या व्यवसायात उतरवले आहे. यासाठी सुमारे १९९.२४ लाख रुपये खर्च करून ६ टुरिस्ट बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. रत्नागिरी, संगमेश्वर, दापोली आणि राजापूर यांसारख्या तालुक्यांमधील १२ हजार ९६६ महिला या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. या बसच्या माध्यमातून आतापर्यंत ४८ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. सिंधुरत्न योजनेचे सदस्य आणि आमदार किरण सामंत यांनी आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी स्थानिकांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी हे उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचा आता प्रत्यक्ष फायदा होताना दिसत आहे.

टाइम्स स्पेशल

​केवळ रस्ते वाहतूकच नव्हे, तर जलपर्यटनातही महिलांनी झेप घेतली आहे. योजनेअंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी खर्च करून जिल्ह्यात 'हाऊसबोट' प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. यामुळे पर्यटकांना कोकणच्या खाडी पर्यटनाचा नवा अनुभव मिळत असून, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे. ​प्रशासकीय मान्यता आणि वितरित निधीचा १०० टक्के विनियोग करून हे सर्व प्रकल्प 'पूर्ण' स्थितीत आहेत. या यशामुळे 'सिंधुरत्न समृद्ध योजना' ही केवळ सरकारी योजना न राहता, कोकणातील महिलांच्या आर्थिक क्रांतीचे प्रभावी माध्यम ठरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg