loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी शासनाचा वाषिक निधी हा औरंगजेबाच्या कबरीच्या देखभाल खर्चापेक्षा कमी- गोविंद भारद्वाज

रत्नागिरी - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी तब्बल ५५ वर्षांनंतर शासनाने वार्षिक निधी ३ हजार रुपयांवरून १ लाख रुपये केला खरा; मात्र हा वाढीव निधी क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीच्या खर्चापेक्षा कमी आणि अत्यंत तुटपुंजा आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी वर्षाला २ लाख ५५ हजार १६० रुपये (वर्ष २०२२-२३) आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला मात्र १ लाख, हे अत्यंत क्लेशदायक आणि दुर्दैवी आहे. हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना दर महिन्याला ५० हजार रुपयांचा निधी देण्याचे निर्देश दिले होते; मग हा निधी कमी कसा काय झाला? प्रशासकीय अधिकार्‍यांच्या लेखी छत्रपती शिवरायांचे मूल्य औरंगजेबापेक्षा कमी आहे का, असा संतप्त सवाल हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक गोविंद भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला संजय जोशी (राज्य समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ), मयूर भितळे, (रत्नागिरी विभाग प्रमुख, गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), अरविंद बारस्कर (शिवचरित्र कथाकार),दीपेश वारंगे (जिल्हाध्यक्ष, गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य), अधिवक्ता अमित काटे आणि सोहम खानविलकर (श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरी)आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद आणि शिवप्रेमी हा निधी वाढवण्यासाठी संघर्ष करत आहेत. महायुती सरकारने नुकताच २० मे २०२६ रोजी शासन निर्णय काढून श्री शिवराजेश्वर मंदिराचे वार्षिक अनुदान १ लाख रुपये केले. वरवर पाहता ही वाढ चांगली वाटत असली, तरी वास्तवात हा निधी आताही अत्यंत अपुरा आहे. माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्ष २०२२ आणि २०२३ मध्ये तब्बल २,५५,१६० व २,००,६२६ रुपये निधी दिला गेला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg