संगलट (खेड)(प्रतिनिधी) - खेड शहरातील हनुमान पेठ येथे वेळोवेळी ट्राफिक जाम होत असल्याने नागरिकांतून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी काही व्यापाऱ्याचे ट्रान्सपोर्ट मार्फत माल उतरला जात असतो. त्यामुळे सदरचे ट्रक भर रस्त्यामध्ये उभा केला असतो. त्यामुळे अर्धा ते पाऊण तास ट्राफिक जाम होत असते. याबाबत वेळोवेळी आवाज उठून देखील प्रशासन कोणती दखल घेत नाही, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. एक तर या ठिकाणी रस्ता खोदून त्यामध्ये काही ठिकाणी केबल, पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भर रस्त्यामध्ये दगड असल्याने येथेच ठेच लागून पडण्याची घटना होत आहे.
यामध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या मोठ्या प्रमाणात समावेश आहे. तसेच गांधी चौक येथील काही हॉटेलमध्ये वेलोवेळी मोठ मोठ्या गाड्या उभे असतात. काही ठिकाणी सर्वसामान्य लोकांना चालता येत नाही. संबंधित वाहतूक खात्याचे पोलीस फिरताना दिसत आहेत. मात्र कारवाई होताना दिसत नाही, असे नागरिकांतून बोलले जात आहे. एकतर संपूर्ण खेडमध्ये अनेक ठिकाणी अर्धवट रस्ते असल्याने तसेच रस्त्याचे खोदकाम केल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस तोंडावर असताना तीन बत्ती नाका, तळ्याचे वाकण या भागामध्ये संपूर्ण रस्त्याचे काम अर्धवट आणि विचित्र दिसून येत आहे.
मात्र पावसाळ्यात काही प्रमाणात पाऊस पडला तरी या भागामध्ये पावसाचे पाणी जमून वाहतूक बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जुना मुकादम कॉम्प्लेक्स, शितल हॉटेल तसेच भाजी मंडईमध्ये पावसाच पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाचे नियोजन शून्य दिसून येत आहे. तरी याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून हेात आहे.




























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.