loader
Breaking News
Breaking News
Foto

शिर्डीच्या एमआयडीसीत क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे लोकार्पण : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

अहिल्यानगर : जिल्ह्यातील शिर्डी हे जगभरात प्रसिद्ध असलेले एक प्रमुख धार्मिक आणि आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे. पण आता भक्तीसोबतच देशाच्या सुरक्षेसाठी शक्तीचा नवा प्रकल्प सुरू झाला आहे. शिर्डीच्या एमआयडीसी परिसरात 200 एकर जागेवर उभारण्यात आलेल्या भव्य क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे नुकतेच भव्य लोकार्पण करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात ऐतिहासिक आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत'चा जो संदेश दिला होता, त्याची यशस्वी अंमलबजावणी आज होताना दिसत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशाने संरक्षण क्षेत्रात इतकी मोठी प्रगती केली आहे की, आज आपला देश केवळ स्वावलंबी बनला नसून संरक्षण साहित्याचा मोठा निर्यातदार बनला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg