loader
Breaking News
Breaking News
Foto

पांगरी येथील अपघातात हातखंबा बौद्धवाडीतील दोन तरुणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

रत्नागिरी : रत्नागिरी–देवरुख राज्य महामार्गावर रविवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. मोटरसायकलचा ताबा सुटून ती रस्त्यालगत असलेल्या कट्ट्याला आदळल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत हातखंबा बौद्धवाडी येथील सुमित विकास कांबळे (वय ३५) आणि विकास काशीराम कांबळे (वय ३८) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विकास चंद्रकांत कांबळे (वय ३८) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही देवरुख येथे लग्नसमारंभ आटोपून रत्नागिरीकडे परत येत असताना पांगरी परिसरात हा अपघात झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघातानंतर जखमींना तातडीने जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले. या घटनेमुळे हातखंबा परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg