loader
Breaking News
Breaking News
Foto

रुपाली कदम यांची रत्नागिरी दक्षिण महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

देवरूख (सुरेश सप्रे) - रत्नागिरी दक्षिण भाजप महिला मोर्चा संघटन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पक्षाच्या उच्च नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयानुसार रुपाली रुपेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अत्यंत मोठे, प्रभावी व निर्णायक योगदान आहे. रत्नागिरी दक्षिण भागाच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून, महिला नेतृत्वात नवी ताकद आणण्याच्या उद्देशाने प्रदेशाध्यक्षांनी रुपाली कदम यांच्या नावाला प्राधान्य देत नियुक्ती केली, ही बाब या नियुक्तीची विशेष वैशिष्ट्य आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा परिषद निवडणुकीत रुपाली कदम यांनी अत्यंत अटीतटीची व उल्लेखनीय लढत दिली होती. निवडणुकीत त्यांनी केवळ भक्कम मताधिक्याने स्पर्धा केली नाही, तर संपूर्ण विभागात महिलांमध्ये, तरुणांमध्ये आणि सामाजिक स्तरावर अतिशय सकारात्मक जनसंपर्क निर्माण केला. पक्ष नेतृत्वाने त्यांच्या या लढाऊ वृत्तीची, व जनतेशी असलेल्या सुसंवाद सातत्यपूर्ण कार्य, सामाजिक कामातील उपस्थिती आणि महिला कार्यकर्त्यांसाठी केलेल्या पुढाकाराची विशेष दखल घेत ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपविली आहे. संघटनाला बळकटीसाठी ही निवड खासदार नारायण राणे व मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.

टाईम्स स्पेशल

रत्नागिरी दक्षिण भाजप महिला मोर्चा अधिक गतिमान, सर्वसमावेशक कार्य पुढे नेईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. महीला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, महीला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षो ढेकणे व वरीष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात महिला सक्षम करणासाठी व संघटन विस्तारासाठी आणि भाजपची विचारधारा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मी अधिक जोमाने कार्य करण्यासाठी मी कटीबद्ध आहे. असे कदम यांनी शेवटी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg