loader
Breaking News
Breaking News
Foto

वरंध घाट रुंदीकरणात हजारो वृक्षांची कत्तल; पर्यायी वृक्ष लागवडीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष?

संगलट खेड (इक्बाल जमादार) - महाडवरून पुण्याला जोडणाऱ्या महाप्रळ पंढरपूर या मार्गावर रुंदीकरणाचे काम सुरु गेली कांही वर्ष सुरु आहे. या रुंदीकरणात वरंध आणि भोर घाटात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. यामुळे वनसंपदा नष्ट होत आहे. यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या दुर्लक्षितपणामुळे हा मार्ग ओसाड झाल्याचे चित्र या महामार्गावरून जाताना पाहण्यास मिळत आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या महाप्रळ पंढरपूर या मार्गाचे रुंदीकरण काम सुरु आहे. भोर हद्दीत रुंदीकरणात अडथला ठरणारे वृक्ष आणि झुडपे जेसीबी च्या सहाय्याने काढण्यात येत आहेत. राजेवाडी ते वरंध भोर महाड या महामार्गावर पूर्वी मोठ्या प्रमाणावर वृक्षांचे जंगल होते. मात्र रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी जुनी व महाकाय वृक्ष तोडण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाड-भोर-वरंध या महामार्गावरील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी जुनी महाकाय वृक्ष तोडल्यानंतर त्या जागी पर्यायी वृक्ष लागवड करणे गरजेचे होते. मात्र याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे धोरण काय आहे, याबाबत ना राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून स्पष्ट केले जाते ना संबंधित काम करणारा ठेकेदाराकडून केले जात. त्यामुळे या महामार्गावरील पूर्वीचे वैभव नवीन रस्त्यामुळे गमावले आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांना विचारले असता मागील वर्षी वृक्ष लागवड केली होती. तशीच वृक्ष लागवड यावर्षी पावसाळ्यात केली जाईल, असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात मागील वर्षी केलेले वृक्ष लागवडी मध्ये किती वृक्ष जुन्या वृक्षांच्या जागी लावले व त्यातील किती वृक्ष सध्या त्या जागी आहेत. याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता वृक्ष लागवड केलेल्याचे कुठे पाहण्यास मिळत नाही.

टाईम्स स्पेशल

वरंध आणि भोर घाट रस्त्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. यामध्ये आयुर्वेदीक वनस्पती तसेच जैव विविधता मोठ्या प्रमाणात आहे. हि जैवविविधता या वृक्ष तोडीमुळे नष्ट होत चालली आहे. जागतिक पर्यावरण यादीत या घाटाचा समावेश असून देखील पर्यावरण संवर्धनाकडे महामार्ग विभाग आणि वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वृक्ष तोडीनंतर नवीन वृक्ष लागवडीकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. महाड वरंधा भोर या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर महाकाय वृक्षांची तोड करण्यात आली मात्र पुन्हा वृक्ष लागवडी बाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे व संबंधित ठेकेदाराचे कोणतेही धोरण नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg