राजापूर (संतोष कांबळे): तालुक्यातील तळवडे गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषित झाले. यानिमित्त तळवडे गावाला शासनाकडून ५४ लाख रुपये मिळणार आहेत. मधाचे गाव म्हणून घोषित होणारे तळवडे हे अकरावे गाव आहे. मधाचे गाव घोषित झाल्यावर तळवडे गावात खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मधकेंद्र योजनेंतर्गत मधपाळ प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाला तळवडे गावच्या सरपंच गायत्री साळवी, मध सुपरवायझर शंकर चाटे, कृषि विस्तार अधिकारी सावंत, प्रथमेश पाटील, ग्रामसेवक मंगेश जाधव, मध क्षेत्रीय अधिकारी गिरीश पांचाळ आदी उपस्थित होते. प्रशिक्षणात तळवडे गावातील २७ लाभार्थी व इतर गावातील ४ अशा ३१ लाभार्थ्यांना मधपाळ प्रशिक्षण देण्यात आले. मधाचे गाव घोषित होणारे तळवडे हे महाराष्ट्रातील अकरावे मधाचे गाव ठरले आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ,रत्नागिरी यांच्या मार्फत मधपालन प्रशिक्षणात शंकर चाटे यांनी मधमाशांची वसाहत म्हणजे काय वसाहतीतील घटक (राणी माशी, कामकरी माशी, नर माशा) तसेच मधमाशांची शरीर रचना व जिवनक्रम याविषयी प्रशिक्षणार्थीना माहिती दिली व गिरीश पांचाळ यांनी मधुबन स्थापना, मधुबन जागेची निवड करणे, वार्षीक फुलोरा कालचक्र, मधु वनस्पतीची माहिती प्रशिक्षणार्थीना दिली.






































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)

















78.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.