loader
Breaking News
Breaking News
Foto

सुकोंडी मंडलिकवाडी येथे क्रिकेट स्पर्धा उत्साहात

दापोली (प्रतिनिधी) : सुकोंडीतील यंग स्टार क्रिकेट मंडळ आणि मंडलिकवाडी ग्रामस्थ मंडळ यांचे विद्यमाने श्री हनुमान जयंती निमित्त नाईट लाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. एकूण १६ संघाचा सहभाग असलेल्या या सामन्यांत आंजर्ले बिरवाडीतील शिवशक्ती क्रिकेट संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात यंग स्टार सुकोंडी संघाचा पराभव करत विजय संपादन केला. स्वप्नील आंजर्लेकर यांना मालिकावीर, प्रथमेश आंजर्लेकर यांना उत्कृष्ट फलंदाज व अक्षय रहाटे यांना उत्कृष्ट गोलंदाजाचा सन्मान प्रदान करण्यात आला. खेळाडूंच्या सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरीमुळे अंतिम सामन्यात शिवशक्ती क्रिकेट संघाला विजयावर शिक्कामोर्तब करता आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg