loader
Breaking News
Breaking News
Foto

कडवई बाजारपेठ हनुमान मंदिरात दि.१ व २ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव

कडवई बाजारपेठ येथील श्री देव हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे यावर्षीही ‘श्री जय हनुमान सेवा मंडळ’ च्या वतीने दि. १ व २ एप्रिल २०२६ रोजी श्री देव हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री जय हनुमान सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या हनुमान मंदिरात सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री देव हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम पुढीलप्रमाणे- स. ७ वा. ‘श्रीं’वर अभिषेक, सायं. ५ वा. श्रीराम नाम, सायं. ६ वा. आरती व मंत्रपुष्प, सायं. ६.३० ते ८ वा. हरीपाठ (संत शिरोमणी श्री गोरोबा काका हरीपाठ महिला मंडळ, माखजन, कुंभारवाडी), रात्रौ ८ वा. महाप्रसाद, रात्रौ ९.३० वा. ह.भ.प. श्री. पुरुषोत्तमबुवा पोखरणकर, कुडाळ यांचे सुश्राव्य किर्तन. पहाटे ५ वा. जन्मोत्सवाचे कीर्तन- ह. भ. प. श्री. पुरुषोत्तमबुवा पोखरणकर, स. ७ वा. ‘श्री’वर अभिषेक, दु. १ वा. महाप्रसाद, दु. ३ वा. हळदीकुंकू, दु. ३ ते ४ वा. भजन- श्री जय हनुमान महिला मंडळ, सायं. ४ ते ५ सामुहिक रामरक्षा, हनुमान चालिसा व मारुती स्तोत्र पठण, सायं. ५.३० ते ६.३० ‘श्रीं’च्या मूर्तीसह मंदिरास प्रदक्षिणा, सायं. ६.४५ ते ७.३० आरती व मंत्रपुष्प, रात्रौ ७.४५ ते ९ वा. महाप्रसाद, रात्रौ ९.३० वा. स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम.

टाइम्स स्पेशल

तरी श्री देव हनुमान जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सर्व कार्यक्रमांचा, महाप्रसादाचा व श्री देव हनुमानाचे दर्शनाचा सर्व भाविकांनी आवर्जून लाभ घ्यावा असे ‘श्री जय हनुमान सेवा मंडळा’तर्फे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg