loader
Breaking News
Breaking News
Foto

हेदूस येथील नारीशक्तीने केला कोकणच्या लोककलेचा सन्मान

दोडामार्ग (प्रतिनिधी) - आपली कोकण संस्कृती आणि लोककलेचा सन्मान यासाठी सिद्धिविनायक स्वयं सहाय्यता महिला समूह सासोली - हेदुस यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला असून दशावतार कलावंत यांचा विशेष सत्कार हेदूस येथील नारीशक्तीने केला. दशावतार हे केवळ एक नाटक नाही तर आपल्या कोकणची परंपरा, संस्कृती आणि भक्ती यांचा सुंदर मिलाफ आहे. रात्रीच्या प्रहरी दमदार आवाजात आणि अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे कलाकार म्हणजे लोककलेचे खरे पाईक आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परशुरामाच्या या पावन भूमीत कला आणि संस्कृतीचा सुगंध कायमच दरवळत राहतो. अशाच अस्सल अशा लोककलेचा सन्मान आणि आज ज्या कलाकारांमुळे दशावतार जिवंत आहे त्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सासोली हेदुस (कागदकारखाना)ग्रामस्थ व सिद्धिविनायक स्वयं सहाय्यता महिला समूह हेदुस यांनी पुढाकार घेत सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ कसई -दोडामार्गचे मालक उत्कृष्ट राजपात्र कलाकार केशव खांबल व सर्व कलाकार यांना शाल श्रीफळ देऊन गौरव केला.

टाईम्स स्पेशल

भिवा बाबुराव करमळकर यांच्या आग्रहास्तव हेदुस ग्रामस्थ व महिला यांनी या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते. यावेळी सिद्धिविनायक स्वयं सहाय्यता महिला समूहाच्या संजना संजीवन गवस, अश्विता अरुण ठाकूर, किंजल केशव खांबल, अनुराधा बाळकृष्ण सुतार, कीर्तीमाला भिवा करमळकर, अनिता अर्जुन करमळकर, अंजली प्रशांत करमळकर, तपस्वी समीर ठाकूर, सुप्रिया लक्ष्मीकांत करमळकर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg