loader
Breaking News
Breaking News
Foto

सेंट ॲन विद्या निकेतन लांजा येथे आरोग्य जनजागृती कार्यक्रम संपन्न

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जावडे अंतर्गत उपकेंद्र गवाणे ग्रामपंचायत देवधे येथील सेंट अ‍ॅन विद्यानिकेतन स्कूल लांजामध्ये आरोग्य जनजागृती कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी डॉ. भाग्यश्री हेडाऊ यांनी विद्यार्थिनींना एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरणाबाबत सविस्तर माहिती दिली व एचपीव्ही विषाणूमुळे होणार्‍या आजारांबाबत तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी या लसीचे महत्त्व स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लसीकरण सुरक्षित व प्रभावी असल्याचे सांगत योग्य वयात लस घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनींना वैयक्तिक स्वच्छता, पोषण आणि आरोग्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg