loader
Breaking News
Breaking News
Foto

रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेत प्रशांत बेर्डे प्रथम

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - दीपशिखा संस्कृत संघ आणि गिरीतेज यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ऑनलाईन रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धा २०२६ या स्पर्धेत लांजातील प्रशांत रघुनाथ बेर्डे यांनी खुला गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारतीय संस्कृतीचे जतन आणि संस्कृतचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धा ४ ते ९ वयोगट पहिले १० श्लोक, १० ते १७ वयोगट पहिले १५ श्लोक, १९ च्या पुढे खुला गट : ध्यानापासून संपूर्ण रामरक्षा अशा तीन गटात घेण्यात आल्या. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन या स्पर्धेत लांजातील प्रशांत रघुनाथ बेर्डे यांनी खुल्या गटात राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. प्रशांत बेर्डे यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg