loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल पंचायत समितीसमोर आदिवासी बांधवांचे आमरण उपोषण सुरू

पनवेल :- तालुक्यातील कोरळवाडी आणि दाभोळवाडी येथील आदिवासी बांधवांनी शाळा आणि अंगणवाडीच्या प्रश्नांवरून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत १ एप्रिल २०२६ पनवेल पंचायत समितीसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोरळवाडी येथील १ ली ते ४ थी पर्यंतची प्राथमिक शाळा बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून लहान मुलांना शिक्षणासाठी दूरवर जावे लागत आहे. तसेच कोरळवाडी आणि दाभोळवाडी येथे सुमारे दहा महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या अंगणवाडी इमारतींचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही. जबाबदार ग्रामविकास अधिकारी, ठेकेदार, महिला बालकल्याण अधिकारी आणि वनजमीन हस्तांतरण प्रस्तावास वीलंब केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अंगणवाडी नसल्यामुळे येथील बालकांना सुरक्षित व आवश्यक सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात आपटा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया देत आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू असून सुवर्णा वाघे, सोनाली पवार आणि प्रगती वाघे या महिलाही उपोषणात सहभागी झाल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

जोपर्यंत बंद प्राथमिक शाळा पुन्हा सुरू केली जात नाही आणि अंगणवाडी बांधकामास तात्काळ सुरुवात होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा ठाम इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनाला आपटा पंचायत समिती सदस्य मयूर शेलार, कोळखे पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, स्वप्नील भोवड, गुळसुंदे ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील तसेच ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी राजू पाटील, जयवंत पाटील, राजेश रसाळ, रोहिणी ठाकूर आदींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg