loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीचे क्रिकेट प्रशिक्षक यासीन मुलाणी यांचे हृदयविकाराने निधन

​सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी येथील क्रिकेट प्रशिक्षक यासीन मुलाणी (वय ५९, रा. कारिवडे-साईलनगर) यांचे आज शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक निधन झाले. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. ​याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यासीन मुलाणी हे नेहमीप्रमाणे आज सकाळी सातच्या सुमारास फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. चालत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्याच क्षणी त्यांची प्राणज्योत मालवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी सावंतवाडी आणि परिसरातील अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटूंना खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू तयार झाले आहेत. केवळ एक उत्तम प्रशिक्षकच नव्हे, तर एक मनमिळावू आणि खिलाडू वृत्तीचे व्यक्तिमत्व म्हणून ते क्रीडा क्षेत्रात परिचयाचे होते. त्यांच्या निधनामुळे सावंतवाडीत हळहळ व्यक्त केली जात आहे. ​त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg