loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे महापालिकेने सन 2026-27 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके केली करदात्यांना उपलब्ध

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ०१ एप्रिल, २०२६ रोजी तयार करण्यात आली असून, एसएमएस व लिंकच्या माध्यमातून करदात्यांना पाठविण्यात आली आहे. या एसएमएस मध्ये मालमत्ता कर भरण्याची तसेच मालमत्ता कराचे देयक पाहण्याची लिंक करदात्यास उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये ठाणेकर करदात्यांनी कर जमा करुन महापालिकेस सहकार्य केले आहे, त्याबद्दल महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत. तसेच सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर (थकीत रकमेसह) एकत्रित महापालिकेकडे खालील कालावधीत भरल्यास, दुसऱ्या सहामाहीच्या करातील सामान्य करामध्ये खालील प्रमाणे सूट/सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१५ जून २०२६ पर्यंत आपला कर भरल्यास १०% सूट,१६ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत कर भरल्यास ०४% सूट, ०१ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत कर भरल्यास ०३% सूट तर ०१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कर भरल्यास ०२% सूट दुसऱ्या सहामाहीच्या करातील सामान्य करावर दिली जाणार असल्याचे कर विभागाने नमूद केले आहे. त्याचप्रमाणे सन २०२६-२७ या आर्थिक वर्षांची मालमत्ता कराची देयके प्रिंट करुन करदात्यांना पोहचविण्यात येत आहेत. तसेच propertytax.thanecity.gov.in या लिंकच्या माध्यमातून कराची देयके उपलब्ध असून, याद्वारे त्यांचा कर ऑनलाईन पध्दतीने जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्र तसेच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रामधील संकलन केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत तसेच शनिवारी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०४:३० वाजेपर्यंत कार्यरत आहे.

टाईम्स स्पेशल

करदाते आपला मालमत्ता कर महापालिकेच्या प्रभाग स्तरावरील कोणत्याही संकलन केंद्रावर क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, चेक, डीडी तसेच रोखीने भरणा करु शकतात तसेच Google Pay, PhonePe, BHIM APP, Paytm व WhatsApp Chatbot (912225331590) च्या माध्यमातून सुलभतेने मालमत्ता कराचा भरणा करु शकतात. तरी ठाणेकर करदात्यांनी मालमत्ता कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg