loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत HPV लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वी

दापोली (प्रतिनिधी) : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, दापोली व दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उपजिल्हा रुग्णालय, दापोली यांच्या मार्फत आयोजित HPV लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा ए. जी. हायस्कूल, दापोली येथे उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला. या मोहिमेसाठी समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. कार्यक्रमास दशानेमा गुजर युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, कार्याध्यक्ष ऋषिकेश तलाठी, उपाध्यक्ष निकेत मेहता, संघटनेचे सदस्य सीए ऋषिकेश शेठ, अथर्व मेहता, सार्थक बुटाला व कल्पेश तलाठी व इतर सदस्य उपस्थित होते. शाळेच्या वतीने मुख्याध्यापक कांबळे , श्री.महाजन , श्री .दाभोळे यांनी सहकार्य केले. तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे, उपजिल्हा रुग्णालय दापोली येथील डॉ. शताक्षी कुलकर्णी, मळेकर सिस्टर, अस्मिता सिस्टर, जाधव सिस्टर व सर्व आरोग्य कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या लसीकरण मोहिमेला मुलींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पुढील टप्प्यांसाठीही अशीच साथ मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. आपल्या शाळेत अशी लसीकरण मोहीम राबवायची असल्यास दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg