केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - दि प्राईड इंडिया रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा व संगमेश्वर तालुक्यातील 80 गावातून एचडीएफसी बँक परिवर्तन बँकेच्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी या निधीतून काजू उत्पादक शेतकरीही प्रक्रीया उद्योगात येऊन आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम व्हा या हेतुने काजू प्रकीया युनिट देण्यात आले असुन शेतकरी काजु युनिटांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.
शेती व शेतीतून ग्रामीण विकास या प्रकल्पांतर्गत 2021 पासून दी प्राईड संस्था काम करीत आहे. कोकणच्या या नैसर्गिक साधन संपत्ती मध्ये काजू पिकामध्ये बहुतांशी पोषणमूल्यमुळे देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेत काजूची मागणी वाढत आहे, परिणामी शेतकऱ्याचे काजू लागवडी खाली कल वाढू लागला असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत काजू बी आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच आपण पिकवलेल्या काजू बीचे मूल्यवर्धन होऊन काजू उत्पादक शेतकरीही प्रक्रिया उद्योगात येऊन आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम व्हावा व त्याचे राहणीमान सुधारावे त्यांच्या मालाला चांगला दर्जा व भाव मिळावा याकरिता सदर प्रकल्प कार्यरत आहे. कोकणात सहकार रुजावा व त्यातून शेतकरी उत्पादक गटाला त्यांच्या मागणीनुसार काजू प्रक्रिया युनिट देण्यात येत आहे.
लांजा तालुक्यातील नवलादेवी प्राईड शेतकरी गट वनगुळे, श्री रासाई प्राईड शेतकरी गट कुवे, सिद्धिविनायक प्राईड शेतकरी गट निओशी, कोकणरत्न प्राईड शेतकरी गट इसवली, लकी लकी कॅशुयू शेतकरी गट गौतम गाव, शिवक्रांती प्राईड शेतकरी गट पुनस, श्री गणेश प्राईड शेतकरी गट वाकेड, कृषीधन प्राईड शेतकरी गट प्रभानवल्ली, श्री गणेश प्राईस शेतकरी गट गोवीळ हिरकणी प्राईड शेतकरी गट शिपोशी या गटांचे काजू प्रक्रिया युनिट उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. या उदघाटन प्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीसपाटील, महिला वर्ग, गावविकास समिती सदस्य शेतकरी गटातील सदस्य HDFC बँक मॅनेजर व दि प्राईड इंडिया अधिकारी उपस्थित होते.







































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.