लांजा (संजय साळवी) - पोलीस हे केवळ नागरिकांच्या सुरक्षेसाठीच नव्हे तर पशुपक्ष्यांच्या संरक्षणासाठीही नेहमी तत्पर असतात. याची अनेक उदाहरणे समाजात वावरत असताना आपल्याला पहायला मिळत असतात. लांजा तालुक्याच्या आठवडा बाजाराच्या दिवशी अशीच एक घटना लांजावासियांना पहायला मिळाली. लांजा शहरात जखमी अवस्थेत रस्त्यावर तडफडत पडलेल्या श्वानाच्या मदतीला लांजा पोलीस धावून गेले आणि त्यांनी त्या श्वानाचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र पोलिसांच्या या प्रयत्नांना यश आले नसले तरी त्यांनी दाखविलेल्या या भूतदयेबद्दल प्राणीप्रेमींनी त्यांचे कौतुक केले आहे.
लांजा शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर एका जखमी श्वानाची रस्त्यावर तडफड सुरू होती. मंगळवार हा लांजा तालुक्याचा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने रस्त्यावर नेहमीप्रमाणे माणसांची वर्दळ होती. अनेक वाहनचालक व पादचारी त्या श्वानाला बघून पुढे जात होते. मात्र त्याच्या अवस्थेकडे कुणाचेही विशेष लक्ष नव्हते. याचदरम्यान तेथून लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन भुजबळराव व श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव हे गस्त घालत असताना त्यांच्या हि ही बाब लक्षात आली आणि त्यांनी तात्काळ त्या श्वानाच्या मदतीसाठी धाव घेतली. या तिघांनी रस्त्याच्या मधोमध तडफडणाऱ्या जखमी श्वानाला सुरक्षितपणे बाजूला घेतले आणि त्याच्या अंगावर पाणी शिंथडून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी त्वरित नगरपंचायत प्रशासनाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. तर माहिती मिळताच लांजा नगरपंचायतचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि श्वानाला पुढील उपचारासाठी घेवून गेले. मात्र सर्व प्रयत्न करूनही त्या श्वानाचा अखेर मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने त्या श्वानाच्या मदतीला धावून गेलेल्या लांजा पोलीसांमधील भूतदयेचे लांजावासीयांना दर्शन झाले. या घटनेतून लांजा पोलीसांनी एका मुक्या प्राण्याबद्दल दाखविलेली संवेदनशीलता लांजावासियांची मने जिंकून गेली.





























































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)



























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.