loader
Breaking News
Breaking News
Foto

चोरीच्या गुन्ह्यातील दोघा संशयितांना जामीन मंजूर

मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील राहत्या घरातून सोन्याचे दागिने चोरल्याच्या संशयावरुन दाखल गुन्ह्याचे तपासाकरीता पोलीस कस्टडीत असलेल्या संशयीत अमृता अमर म्हापणकर (रा. कुंभारमाठ ता. मालवण) व राघो सूर्यकांत राऊत (रा. सुकळवाड ता. मालवण) यांना मालवणच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी प्रत्येकी पंधरा हजार रुपयाचा जामीन मंजुर केला आहे. याकामी संशयित आरोपी तर्फे अ‍ॅड. उल्हास कुळकर्णी, अ‍ॅड. प्राची कुळकर्णी, अ‍ॅड.अमेय कुळकर्णी यांनी काम पाहीले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यासंबधीचे अधिक वृत्त असे की, दि. १७ जानेवारी रोजी मालवण येथील समर्थ कृपा संकुलातील फिर्यादी महिलेच्या राहत्या घरातील मंगळसुत्रासहित सोन्याचे दागिने कपाटातून नाहीसे झाल्याबद्दल संशयीतांविरूद्ध फिर्यादीने मालवण पोलीस ठाण्यात दागिने चोरल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार मालवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय्य संहिता कलम ३०५ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याकामी मालवण पोलिसांचा तपास सुरु असताना पोलिसांनी संशयीत अमृता अमर म्हापणकर व राघो सूर्यकांत राऊत यांना अटक करून त्यांना मालवण न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोन्ही संशयितांना पोलीस कस्टडी सुनावली होती.

टाईम्स स्पेशल

या पोलीस कस्टडीची मुदत संपल्याने पोलिसांनी संशयितांना पोलीस कोठडीची मुदत वाढवून मिळण्यासाठी मालवण न्यायालयात सोमवारी हजर केले असता न्यायालयाने पोलीसांची वाढीव पोलीस कोठडीची मागणी फेटाळुन लावत दोन्ही संशयितांची प्रत्येकी पंधरा हजार रुपयाच्या जामीनावर मुक्तता केली आहे. याकामी संशयित आरोपी तर्फे अ‍ॅड. उल्हास कुळकर्णी, अ‍ॅड. प्राची कुळकर्णी, अ‍ॅड. अमेय कुळकर्णी यांनी काम पाहीले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg