loader
Breaking News
Breaking News
Foto

कादंबरी परीक्षणात शेखर पणशीकर प्रथम

सावंतवाडी : आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्या तर्फे जानेवारी महिन्यापासून 'साहित्यिक कै.कुमुद रेगे वाचन साधना उपक्रम' राबवला जात आहे. सहभागी चौदा वाचक दरमहा एक पुस्तक वाचून त्यावर परिक्षण लिहीत आहेत. फेब्रुवारीतील 'कादंबरी' या साहित्य प्रकारात आरवलीतील शेखर पणशीकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर अरुण धर्णे यांना द्वितीय व जयदीप देशपांडे याना तृतीय क्रमांक मिळाला. शेखर पणशीकर यांनी जयवंत दळवी यांच्या 'अंधाराच्या पारंब्या 'या कादंबरीचे परिक्षण केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमांतर्गत प्रियदर्शनी म्हाडगुत यांनी रणजित देसाई यांच्या स्वामी, सरोज रेडकर यांनी विश्वास पाटील यांच्या झाडाझडती, अरुण धर्णे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काळे पाणी, नीलम कांबळे यांनी राजन गवस यांच्या तणकट, स्नेहा नारींगणेकर यांनी वृंदा कांबळी यांच्या कुरवंडी, राजेश वैज यांनी स्मिता देवधर यांच्या फळांचा राजा आंबा, जयदीप देशपांडे यांनी राजेंद्र देशपांडे यांच्या चंद्रगुप्त मौर्य, सोमा गावडे यांनी हरि नारायण आपटे यांच्या पण लक्षात कोण घेतो, वैभवी रायशिरोडकर यांनी सुधा मूर्ती यांच्या महाश्वेता, सायली लोणे यांनी मीना देशपांडे यांच्या अश्रूंचे नाते, अर्चना लोखंडे यांनी शिवाजी सावंत यांच्या झुंज, विनय सौदागर यांनी ह. मो. मराठे यांच्या देवाची घंटा आणि विशाखा वेंगुर्लेकर यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्या माहीमची खाडी अशा चौदा कादंबऱ्यांचे परिक्षण करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

कुडाळ येथील चोखंदळ वाचक प्रसाद रेगे यांनी पुरस्कृत केलेल्या या उपक्रमासाठी कुडाळ येथील ज्येष्ठ साहित्यिक वृंदाताई कांबळी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. कांबळी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी कादंबरीची वैशिष्ट्ये, कथा व कादंबरीतील भेद ,परिक्षणावेळी लक्षात घ्यायचे मुद्दे या विषयी मार्गदर्शन केले व निकाल घोषित केला. याप्रसंगी त्यानी तटस्थतेच्या अवकाशातून व अधुऱ्या कहाणीचा शेवट ही आपली पुस्तके कट्ट्याला भेट दिली. या उपक्रमाच्या संयोजनाचे काम विनय सौदागर यांनी पाहिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg