loader
Breaking News
Breaking News
Foto

पुण्यात पावसाचा धुमाकूळ; वादळी वारे व मेघगर्जनेसह जोरदार बरसला वळीव

पुणे - शहरात अचानक आलेल्या वादळी पावसाने आणि जोरदार वाऱ्यांनी प्रचंड धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. पुणे शहर व परिसरात सोमवारपासून गारांसह मुसळधार पाऊस पडत आहे. दररोज दुपारपर्यंत वातावरण गरम असते. त्यानंतर पावसाला सुरुवात होते. अशा वातावरणामुळे पावसाळा सुरु झाल्यासारखे पुणेकरांना वाटू लागले आहे. दुपारी काही अचानक वातावरणात मोठा बदल झाला आणि जोरदार वारे व ढगांच्या गडगडाटाने शहरातील अनेक भागांमध्ये झाडे उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे तसेच रस्त्यांवर पाणी साचणे अशा घटना घडल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहरातील कोथरूड, औंध, बाणेर, पिंपरी-चिंचवड, हडपसर आणि कात्रज परिसरात सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून आले. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. काही ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. महावितरणकडून अनेक भागांत वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरता बंद करण्यात आला. परिणामी, नागरिकांना सद्या अंधारातच रहावं लागत आहे.अग्निशमन दल आणि महानगरपालिकेच्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत झाडे हटविण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले आहे.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, हवामान विभागाने पुढील 24 तासांतही पुणे आणि परिसरात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अचानक बदललेल्या हवामानामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या वादळी पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासन सतर्क झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg