loader
Breaking News
Breaking News
Foto

मंत्री नितेश राणे यांनी दिले कोकणातील मत्स्यव्यवसाय आणि बंदरांच्या विकासाचे आदेश

​रत्नागिरी : लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी मच्छिमारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी केलेल्या मागणीची दखल घेत, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आमदार सामंत यांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेत, मंत्र्यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे मच्छिमारांना आता व्यावसायिक दराऐवजी 'कृषी दराने' वीज आकारणी केली जाणार आहे. आमदार किरण सामंत यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडल्यानंतर, शासनाने यासंदर्भात निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महावितरण आणि मत्स्यव्यवसाय विभागाची समिती स्थापन करण्याचे आदेश मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजीवडा बंदराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम १ एप्रिल ते ६ एप्रिल दरम्यान निश्चित करण्यात आला आहे. साखरीनाटे बंदरातील गाळाचा प्रश्न सोडवण्यासाठी सिंधुदुर्गच्या धर्तीवर रत्नागिरीतही तातडीने गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. तसेच, गाळ काढल्यानंतर या बंदरांना जोडणारे रस्तेही बांधून दिले जातील, असे आश्वासन देण्यात आले. मच्छिमारांचा डिझेल परतावा आणि बोटींचे प्रलंबित हप्ते पुढील दोन दिवसांत थेट त्यांच्या खात्यात जमा होतील, अशी घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली. याशिवाय, स्थानिक मच्छिमारांना बाजारपेठेसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. विशेषतः राजापूर आणि लांजा या दोन्ही तालुक्यांच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत.

टाईम्स स्पेशल

रत्नागिरीत २५ ते ३० हेक्टर जागेवर 'मरीन क्लस्टर' योजना राबवली जाणार आहे. भगवती बंदर आणि अणसुरे (ता. राजापूर) येथे क्रूझ टर्मिनलसाठी योग्य जागा शोधून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. मिरकरवाडा बंदरातील जुन्या बोटी हटवून तिथे नवीन सोयीसुविधा निर्माण करण्याचे निर्देशही मंत्र्यांनी दिले आहेत. ​आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मच्छिमारांच्या अनेक वर्षांच्या मागण्या आता मार्गी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg