loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगरपरिषद वर्धापनदिनानिमित्त भाजपातर्फे आनंदोत्सव साजरा

खेड (प्रतिनिधी) : खेड नगर परिषदेच्या ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी खेडच्यावतीने भाजपा गटनेते रहीम सहिबोले, नवनिर्वाचित नगरसेविका सौ. वैभवी वैभव खेडेकर तसेच नगरसेविका सौ. स्वप्नाली राकेश चव्हाण यांनी नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना पेढे खाऊ घालत वर्धापन दिनाचा आनंद साजरा केला. यानिमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इतिहासाच्या पार्श्वभूमीवर पाहता, १९१४ ते १९१९ दरम्यान पहिले महायुद्ध तर १९३९ ते १९४५ या कालावधीत दुसरे महायुद्ध झाले. ब्रिटिश काळात पोलीस, न्यायव्यवस्था आणि लष्करी दल यांसारख्या विविध यंत्रणांची स्थापना करण्यात आली. खेड तालुक्यातील शिवतर हे गाव लष्करी सेवेसाठी ओळखले जाते. या गावातील अनेक तरुण आजही देशसेवेत कार्यरत असून ‘मिलिटरीचे गाव’ म्हणून त्याची वेगळी ओळख आहे. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात शिवतर गावातील सुमारे २३४ जवान शहीद झाले होते. त्यांच्या बलिदानानंतर ब्रिटिशांनी गावकर्‍यांना त्यांच्या अपेक्षा विचारल्या असता, ग्रामस्थांनी खेड येथे नगरपरिषदेची स्थापना करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत १९४० साली खेड नगर परिषदेची स्थापना करण्यात आली. आज ८६ वर्षांचा प्रवास पूर्ण करताना खेड नगरपरिषद शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून, या वर्धापन दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी शहरवासीयांना शुभेच्छा देखील दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg