loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवार आंबेरे येथे हनुमान जन्मोत्सवनिमित्त शालेय चित्रंगभरण व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

गावखडी (वार्ताहर) - दरवर्षीप्रमाणे शिवार आंबेरे, पेजेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव अतिशय आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने तरुण विकास मंडळ पेजवाडी व अर्था सोनाली सुदेश नाटेकर यांच्या सौजन्याने शालेय चित्ररंगभरण व वक्तृत्व स्पर्धा अतिशय हर्षोल्हासात संपन्न झाली. लहान मुलांच्या मनात शिक्षणाप्रती तसेच पर्यावरण तंत्रज्ञान याच्याबद्दल सकारात्मक भावना व त्या दृष्टिकोनातून त्यांच्या भविष्यातील जीवनात एक महत्त्वाचा वैचारिक पैलू घडवण्याच्या तसेच आजच्या या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आजच्या या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तरी या स्पर्धेमध्ये आदर्श शाळा भडे क्र. १, जिल्हा परिषद शिवार आंबेरे शाळा क्र. १ व २, जिल्हा परिषद दाभिळ आंबेरे शाळा, जिल्हा परिषद गावडे आंबेरे शाळा क्र. १ व २ या शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखवून मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेमध्ये एकूण ५० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेसाठी निवृत्त शिक्षक दयानंद लाखण, गोपाळ रोकडे आणि दिवाकर तरळ यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले. चित्ररंगभरण स्पर्धा (लहान गट) - प्रथम आयुषा दिलीप पेजे, द्वितीय अद्विता अनिल पोतदार, तृतीय श्रद्धा जितेंद्र सुतार. चित्ररंगभरण स्पर्धा (मोठा गट) - प्रथम साई संदीप शेलार, द्वितीय स्वरा निकेत बिर्जे, तृतीय वेदिका विकास लाखण. वक्तृत्व स्पर्धा - प्रथम अन्वी सुरेंद्र लिंगायत, द्वितीय सिया प्रमोद माईन, तृतीय हर्षा राजेश गिजबिले. यावेळी शिवार आंबेरे गावचे माजी सरपंच व गावातील राजकीय तसेच सामाजिक नेतृत्व जितेंद्र शिर्सेकर, पूर्णगड सागरी पोलिस अधिकारी त्र्यंबक मौळे, होमगार्ड श्री. भितळे, श्री. सारंग, श्री. नानरकर उपस्थित होते. विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, मेडल देऊन सत्कार करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg