संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - फेपडे वाडी, मानसकोंड येथे समाजाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या श्रीराम हनुमान नाट्य कलामंचाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. वाडीचे गावकर सुमंत गणपत फेपडे आणि श्रीराम मंदिर व्यवस्थापन विश्वस्त श्री गणुजी हिरू फेपडे यांच्या हस्ते फीत कापून रंगमंचाचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर जिल्हा परिषदच्या नवनियुक्त सदस्या माधवी गिते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नाट्य कलामंचाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य सुहास मयंगडे, कोळंबे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक रवींद्र मुळे, मुंबई मंडळाचे माजी सचिव भिकाजी फेपडे, मानसकोंडचे पोलीस पाटील सुनील शिगवन, आंबेडचे पोलीस पाटील विकास फेपडे, श्रीराम मंदिरचे उपाध्यक्ष दिलीप पाचकले, मुंबई मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ फेपडे, उपाध्यक्ष रवींद्र फेपडे, खजिनदार व नाट्य सूत्रधार प्रकाश खापरे, सचिव संतोष फेपडे तसेच मुंबई मंडळाचे इतर सदस्य, श्रीराम मंदिर ट्रस्टी आणि नाट्य दिग्दर्शक दत्ताराम मांजरेकर उपस्थित होते.
नवीन उभारण्यात आलेल्या या नाट्य कलामंचाचा उद्देश केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून सामाजिक व प्रबोधनात्मक कार्याला चालना देणे हा आहे. या मंचावर विविध नाट्य कलाकृती सादर करण्यात येणार असून, समाजप्रबोधनासाठी हा मंच विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच परिवर्तनवादी उपक्रमांना प्रोत्साहन देणे, अल्प मानधनात लग्न समारंभासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि मंडळाच्या साहित्याची जपणूक करणे, अशी या उपक्रमामागील व्यापक भूमिका आहे. या उपक्रमामुळे गावातील सांस्कृतिक चळवळीला नवे बळ मिळणार असून, समाजातील एकोपा आणि प्रगतीसाठी हा नाट्य कलामंच महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे.
हा रंगमंच साकारण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणुजी फेपडे, गणपत फेपडे, दिपक फेपडे, हरिश्चंद्र फेपडे, सुनील शिगवण, सुहास मयंगडे, परशुराम फेपडे, दिलीप पाचकले, दिनेश पाचकले, अनंत गार्डी, अशोक भोसले, विजय भोसले यांच्यासह बांधकाम कारागीर संजय फेपडे यांची टीम, शेड कारागीर प्रफुल्ल खापरे, प्लंबिंग कारागीर दशरथ फेपडे तसेच इलेक्ट्रिक कारागीर रुपेश फेपडे, नागेश फेपडे, गणेश फेपडे आणि ओमकार कळबाटे यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन रमेश खापरे यांनी तर सूत्रसंचालन आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त नथुराम पाचकले यांनी केले. एकूणच, हा लोकार्पण सोहळा गावाच्या सांस्कृतिक उभारणीचा नवा अध्याय ठरला असून, सामाजिक एकतेचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.




































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.