मालवण (प्रतिनिधी) - शाळा हे एक सर्वोत्तम संस्कार केंद्र आहे. देशाची भावी पिढीला, म्हणजेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक परिपक्वते प्रमाणे, संस्कारक्षम करण्याचे काम शाळा करत असते. अशा कौतुकास्पद शाळेचा अभिमान प्रत्येक आजी माजी विद्यार्थी व शिक्षकांबरोबर ग्रामंस्थांना असतो. असाच अभिमान, आज पराड गावात सर्वत्र फुलला आहे. याचा सुगंध जिल्हाभर पसरला असल्याने पराड गावाचा आदर्श, जिल्ह्याने घ्यावा असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख आणि उद्योजक दत्ता सामंत यांनी पराड येथे बोलताना केले. मालवण तालुक्यातील पराड येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवी समारंभात शिवसेना जिल्हाप्रमुख आणि उद्योजक दत्ता सामंत हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मालवण सभापती प्रज्ञा चहाण, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, सोसायटी चेअरमन दीपा सावंत, सरपंच नेहा परब, मुंबई मंडळाचे अध्यक्ष आबा पाटकर, जया पराडकर, शतक महोत्सव समिती अध्यक्ष प्रदीप आवळेगांवकर, सरपंच रश्मी टेंबुलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपलक्ष्मी पराडकर, दीपा सावंत, आशा पाटकर, व अन्य मान्यवर ग्रा. पं. सदस्य विवेक जबड़े, अंकिता सावंत, वैष्णवी लाड, केंद्राप्रमुख नंदकिशोर गोसावी, रंगनाथ आजगांवकर, आतीक शेख, सलिम शेख, सागर मालवदे तंटामुक समिती अध्यक्ष बिपीन परब पोलीस पाटील विश्वास मालवणकर, मुख्याद्यापक कृष्णा कालकुंद्रिकर, शिक्षिका शीतल पाटील, महेश नाईक, रावजी चव्हाण आदी व इतर उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक कालकुंदीकर यांनी स्वागत करीत प्रास्ताविक केले. यावेळी सामंत पुढे म्हणाले, पराड हा श्रमीकांचा शेतीप्रधान गांव आहे. प्रत्येकजण मेहनती आहेत. या शाळेसाठी व शतक महोत्सवासाठी येथील प्रत्येकांनी श्रमदान केल्याची मला माहिती मिळाली. म्हणुनच माझ्या तालुक्यातील एक गांव शासनाच्या निधीची वाट न पहाता श्रमदान कामे करुन यशस्वी होतो त्या गावासाठी व शाळेसाठी आम्ही सर्व विकासकामे करायला तयार आहेात असे ते म्हणाले. यावेळी जि. प. वित व बांधकाम सभापती संतोष साटविलकर म्हणाले, शाळेच्या महोत्सवी सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षिदार आहोत, हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे. यानिमिताने शाळेच्या जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. ८ मार्च रोजी या कार्यक्रमाला सुरुवात करून जागतिक महिला दिनाची जोड देत ही सुंदर संकल्पना, पराड या श्रमिक गावात पुस्तकी ज्ञान देताना स्वावलंबनाचे धड़े दिले जातात, असे सांगितले.
यावेळी केक कापून शाळेच्या शतक महोत्सवी वाढदिवस व स्मरणिकेचे प्रकाशन करून, शतक महोत्सव साजरा करण्यात आला. १९६४ साली आदम शेख महम्मद, मोहम्मद शेख हुसेन व शेख परिवार पराड यांनी शाळेला विनामोबदला जमीन दिल्याने, कायमस्वरुपी दगडी पाटीचे अनावरण करण्यात आले. ग्रामस्थांच्या अथक श्रमदानातुन कार्यक्रम यशस्वी झाला. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेतील दोन्ही शिक्षक यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत मुख्याध्यापक कृष्णा कालकुंद्रीकर व सहशिक्षिका शितल पाटील यांना ग्रामस्थ व पालक यांच्यामार्फत मानपत्र, जया पराडकर मार्फत सन्मानचिन्ह, तसेच दुर्गादेवी मंडळ मार्फत सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत तर आभार प्रदीप आवळेगांवकर यांनी मानले.











1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.