loader
Breaking News
Breaking News
Foto

शासकीय व निमशासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

ठाणे (प्रतिनिधी) : शासकीय व निमशासकीय कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत एकूण १२ संघांनी सहभाग नोंदवून मैदान गाजवले. ठाणे सेंट्रल मैदानावर अवघ्या एका दिवसात संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. सर्व संघांनी खेळाडूवृत्ती, शिस्तबद्धता आणि उत्साह यांचे उत्कृष्ट दर्शन घडवले. प्रत्येक सामना अत्यंत रोमांचक ठरला असून खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी सादर केली. या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शारीरिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे होय. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे वाढणारा ताणतणाव कमी करण्यासाठी अशा क्रीडा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरत असून, यामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि एकूण आयोजन अत्यंत उत्तम पद्धतीने करण्यात आले होते. आयोजकांच्या परिश्रमांमुळे संपूर्ण स्पर्धा सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये एकोपा, मैत्रीभाव आणि क्रीडास्पर्धेची भावना अधिक दृढ झाली. सहभागी खेळाडू तसेच उपस्थित प्रेक्षकांनी या स्पर्धेचे मनापासून कौतुक केले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत ठाणे कॉप्स संघाने दमदार खेळ करत विजेतेपद पटकावले, तर ठाणे ग्रामीण पोलीस संघाने उपविजेतेपद मिळवले. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg