loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीचे माजी सभापती बाळा गावडे यांचा 'सेना भवन'वर पक्षप्रवेश; ठाकरे गटात घरवापसी

सावंतवाडी (प्रतिनिधी): सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना आता वेग आला असून, शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई येथील 'सेना भवन' येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. ​बाळा गावडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात शिंदे शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, आज त्यांनी पुन्हा आपल्या मूळ पक्षात परतण्याचा निर्णय घेतला. या प्रवेशावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते व माजी खासदार विनायक राऊत, तसेच ठाकरे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी उपस्थित होते. गावडे यांच्या घरवापसीमुळे सावंतवाडी तालुक्यात ठाकरे गटाची ताकद वाढणार असून, शिंदे शिवसेनेला हा एक धक्का मानला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg