सावंतवाडी (प्रतिनिधी) - शांतीसेना ‘ऑपरेशन पवन’ (श्रीलंका) दरम्यान ३ एप्रिल १९८८ रोजी वीरमरण आलेले चौकुळचे सुपुत्र शहीद हवालदार रामचंद्र सोमा गावडे यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि स्मारकाचे उद्घाटन येत्या बुधवार, ३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ-केगदवाडी येथील 'रामचंद्र निवास' येथे हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच ५ मराठा एल.आय. चे कर्नल धैर्यशील जमदाळे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय अधिकारी समीर घारे आणि तहसीलदार श्रीधर पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता उपस्थितांच्या स्वागताने होईल. त्यानंतर १०:३० वाजता मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येईल. ठीक सकाळी ११ वाजता शहीद हवालदार रामचंद्र सोमा गावडे यांच्या पुतळ्याचे अनावरण होईल, त्यानंतर स्मारक उद्घाटन व श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडेल. दुपारच्या सत्रात वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असून, गावातील व बाहेरून आलेल्या माजी सैनिकांचाही गौरव केला जाणार आहे. मान्यवरांच्या मनोगतानंतर आभार प्रदर्शन आणि स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता होईल. या सोहळ्यासाठी माजी सैनिक संघटना, ग्रामपंचायत पदाधिकारी, केगदवाडीतील ग्रामस्थ आणि गावडे परिवाराने सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)

























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.