loader
Breaking News
Breaking News
Foto

परमेश्वर धामणकर यांचा शौर्य पुरस्काराने सन्मान

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - केवळ पगार मिळतो म्हणून,काम करणारे अनेक असतात.किंबहुना ही सामान्य प्रकृती आहे.पण एखाद काम करताना ते व्रतस्थ पणे अविरत करणे हे अपवादात्मकच पहायला मिळते. आपण करत असलेल्या कामाला सेवा, तत्परता, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, मदत, मेहनत, समर्पण या शब्दांची किनार असेल तर ती व्यक्ती ध्रुव ताऱ्याच्या तेजाप्रमाणे समाजात सहज चमकताना दिसते. अशा व्यक्ती खर तर पुरस्काराने मोठ्या नं होता, त्या पुरस्काराची उंची वाढवतात. संगमेश्वर तालुक्यातील माखजन गावचा सुपुत्र असलेला परमेश्वर कांता धामणकर आणि सगळ्याना जवळचा वाटणारा 'परब्या' याला अखिल चित्तपावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरी यांनी सं २०२५-२६ चा स्वा.विनायक दामोदर सावरकर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केले. परमेश्वर हा महावितरण चा कंत्राटी कर्मचारी म्हणून आरवली विद्युत उपकेंद्रांतर्गत तारतंत्री म्हणून काम पाहतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परमेश्वर चे वैशिष्टय म्हणजे तारतंत्री म्हणून काम करताना ऊन, पाऊस, वारा, थंडी काहीही असो, काळ वेळ या कोणत्याच गोष्टीच बंधन नं पाळता व्रतस्थ काम करणे, वेळेला जीवावर उदार होऊन ही अति जोखमीची व धोक्याची कामे देखील लीलया पूर्ण करणे हा त्याचा हातखंडा. रात्रीच्या कीर्रर्र अंधारात डोक्यावर कोसळणारा पाऊस, आणि विजांचा कडकडाट पाहून, गावातीलच लोकांना अनेकदा किव येते. अरे परब्या थांब.! आजचे, उद्या लाईट आले तरी चालतील. पण ज्या शाळेत घडला त्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन च ब्रीद वाक्य आहे 'नियतं कुरु कर्मत्वम्' या वाक्याला छेद देईल तर तो परमेश्वर कसला. शेवटी संस्कारच आपल्या कार्यात परवर्तीत होत असतात हे खर. अस काम करणारी माणस जगाच्या पाठीवर विरळाच सापडतात. माखजन पंचक्रोशीत तारतंत्री म्हणून साक्षात 'परमेश्वर' असल्यामुळे कोणत्या गावचा उत्सव काळोखात साजरा होतोय. अस कधी चित्र पाहायला मिळत नाही. कोणतेही कार्यक्रम, समारंभ उजेडातच होतात ते या परमेश्वरामुळेच. परमेश्वरच्या या समर्पित कामाची नेहमीच वाहवा होत असते. या गौरवशाली कामाची दखल या संस्थेने घेतली आणि सन्मानित केले.

टाईम्स स्पेशल

ह्या जोखमीच्या कामात परमेश्वर चे दोन तीन अपघात देखील झाले आहेत. पण तरीही त्याने आपल्या कामात केव्हाही कसूर केलेली नाही. खर तर अशा समर्पित सेवा करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र शासनाने व महावितरण ने सेवेत कायम करण्याची गरज आहे. पण कंत्राटी कामामुळे होतकरू, तरुण,समर्पित काम करणाऱ्यांची परवड होत आहे. हे सरकारच्या लक्ष्यात यायला हवं..किंबहुना स्थानिक आमदारांनी सभागृहात उल्लेखनीय कामाचा प्रस्ताव मांडत परमेश्वर सारख्या तरुणाची सेवेत कायम करण्याविषयी शिफारस करायला हवी एवढीच अपेक्षा. परमेश्वर ला पुरस्कर मिळाल्याने माखजन पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा ही देण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg