loader
Breaking News
Breaking News
Foto

भोस्ते घाटात भीषण अपघात; कंटेनर ट्रक संरक्षण भिंतीवर आदळून हवेत लटकला, दोघे गंभीर जखमी

खेड (दिलीप देवळेकर) : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मंगळवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट घाटातील संरक्षण भिंतीवर जाऊन आदळला. अपघात इतका तीव्र होता की, धडक दिल्यानंतर ट्रकचा पुढील भागाचा चक्काचूर झाला तर ट्रक अर्धवट लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघातात ट्रकमधून प्रवास करणारे दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रक चालकासह अन्य एक जण ट्रकमध्येच अडकून पडले होते. महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांनी, प्रवाशांनी व मदत ग्रूपचे प्रसाद गांधी यांनी तत्परता दाखवत जखमींना बाहेर काढून मदतकार्य सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच मदत ग्रुप तसेच जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्थेची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना मदत ग्रुपच्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, अपघातग्रस्त कंटेनर ट्रकमध्ये थम्सअप कंपनीचे शीतपेय असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून अपघाताची पुढील चौकशी सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg