रत्नागिरी: शहरातील घरगुती गॅस सिलिंडर वितरणावर होणारा ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी आता महानगर गॅस कंपनीच्या पाईपलाईनवर भर दिला जात आहे. रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील ज्या भागात गॅस पाईपलाईनचे जाळे विस्तारले आहे, अशा ठिकाणी नवीन कनेक्शनसाठी नोंदणी करण्यासाठी विशेष शिबिरांचे (कॅम्प) आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या सूचनेनुसार प्रांत जिवन देसाई यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबवण्यात येत असून ४ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत शहराच्या विविध भागांत हे शिबीर पार पडणार आहे.
नोंदणी प्रक्रियेसाठी प्रभागांनुसार वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. यानुसार ४ आणि ६ एप्रिल रोजी आरोग्य मंदिर व शिवाजी नगर परिसरासाठी शासकीय कर्मचारी वसाहत बॅडमिंटन हॉल येथे शिबीर होईल. ७ एप्रिल रोजी ओसवाल नगर आणि एकता मार्ग येथील नागरिकांसाठी ओसवाल नगर सोसायटी हॉलमध्ये सोय करण्यात आली आहे. ८ आणि ९ एप्रिलला उद्यम नगर व परिसरातील रहिवाशांसाठी बाळासाहेब ठाकरे हॉल येथे नोंदणी करता येईल. नाचणे रोड परिसरासाठी १० एप्रिल रोजी दैवज्ञ भवन येथे, तर हिंदू कॉलनी व राजेंद्र नगर भागासाठी ११ एप्रिल रोजी शिवालय हॉलमध्ये हे शिबीर होईल.
पुढील टप्प्यात १३ आणि १४ एप्रिल रोजी माजगाव नाका व मारुती मंदिर परिसरासाठी जव्हेरे मंगल कार्यालय येथे अधिकारी उपस्थित राहतील. १५ ते १७ एप्रिल या तीन दिवसांत टिळक आळी, झाडगाव आणि सुभाष रोड परिसरातील नागरिक वेध मंगल कार्यालय येथे नोंदणी करू शकतील. शेवटच्या दिवशी म्हणजेच १८ एप्रिल रोजी कोकण नगर व राज नगर परिसरासाठी उर्दू शाळा, कोकण नगर येथे शिबीर आयोजित केले आहे. या सर्व ठिकाणी सकाळी निश्चित केलेल्या वेळेत महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज स्वीकारतील. या सुविधेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी गॅस पाईपलाईनसाठी नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
















































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.