वैभववाडी (प्रतिनीधी) - विजयदुर्ग कोल्हापूर महामार्गावर करुळ घाटात सिमेंटने भरलेला ट्रक 300 फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे 5 त्या सुमारास घडला. कोल्हापूरवरून येणारा (KA28 AA5545) सिमेंटने भरलेला ट्रक सुमारे २०० ते ३०० फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत ट्रकमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर व पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सह्याद्री वनजीव रक्षक हेमंत पाटील व त्यांचे सहकारी, तसेच संबंधित तलाठी व कोतवाल यांनीही मदतकार्यामध्ये सहभाग घेतला. मोठ्या प्रयत्नांनंतर दोन्ही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले. मृतदेह पुढील तपासणीसाठी व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, वैभववाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.













































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)


































































































































































































































































































































.jpg)



























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.