loader
Breaking News
Breaking News
Foto

'राजकारणात नसतो तर भारतीय क्रिकेट संघात असतो'; उदय सामंत यांचा पत्रकारांशी दिलखुलास संवाद

देवळे (प्रकाश चाळके) - धावपळीच्या आणि तणावाच्या आयुष्यातून पत्रकारांना थोडा विरंगुळा मिळावा, तसेच त्यांच्यातील मैत्री आणि संघभावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या पुणे येथील इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार क्रिकेट स्पर्धेचे यंदा चौथे वर्ष उत्साहात पार पडले. याप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी उपस्थिती लावत केवळ पत्रकारांशी संवादच साधला नाही, तर स्वतः बॅट हातात धरून क्रिकेटचा मनमुराद आनंदही लुटला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमात बोलताना उदय सामंत म्हणाले की,पुणे जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकार दरवर्षी या स्पर्धेसाठी मोठ्या उत्साहात एकत्र येतात, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. खेळ हे केवळ हार-जितीचे माध्यम नसून ते एकोपा, विश्वास आणि संघटित शक्ती निर्माण करण्याचे उत्तम साधन आहे." या स्पर्धेमुळे पत्रकारांमधील सकारात्मकता आणि मैत्री अधिक घट्ट होत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. पत्रकारांशी गप्पा मारताना सामंत यांनी एक मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले,जर मी राजकारणात नसतो, तर आज नक्कीच भारतीय क्रिकेट टीममध्ये असतो. त्यांच्या या विधानाला उपस्थितांनी दाद दिली. इतकेच नव्हे तर, पुढील वर्षी 'राजकीय नेते विरुद्ध पत्रकार' असा सामना खेळवण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. असा सामना झाल्यास तो केवळ स्पर्धा न राहता मैत्री, स्नेह आणि खेळभावनेचा एक मोठा उत्सव ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

या विशेष प्रसंगी सागर आव्हाड, सज्जाद सय्यद,सचिन हंचाटे, सुमित भोसले, तुषार नन्नवरे, आदित्य भवर यांच्यासह पुणे जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच या उपक्रमाचे कौतुक करत खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg